मुंबई : मालाड येथील क्रीडा संकुलाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरून वाद पेटला आहे. पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते या मैदानाचे उद्घाटन करण्यात आले आहे. त्याआधी परिसरात भाजप, बजरंग दलाने टिपू सुलतान मैदानाच्या नामकरणाला विरोध करत तीव्र आंदोलन केले. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. त्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
तर काँग्रेसकडूनही (Congress) फडणवीसांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय. सत्तेसाठी हे लाचार झालेत अशी टीका फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारवर केलीय. तर काँग्रेसकडून राष्ट्रपतींचा एक व्हिडिओ ट्विट करत भाजपला आरसा दाखवण्यात आला आहे. गेल्या अनेक तासांपासून मालाडमध्ये या आंदोलनामुळे हायव्होल्टेज ड्रामाही पाहायला मिळाला. क्रिडा संकुलाच्या उद्घटनानंतर अस्लम शेख यांनीही भाजपवर जोरदार पलटवार केलाय.
तर सकाळी फडणवीसांनी या नावाला विरोध केला आणि आता पोलिसांच्या या कारवाईवरून फडणवीसांनी पुन्हा महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. तर काँग्रेसकडूनही (Congress) फडणवीसांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय.
देवेंद्र फडणवीस यांचे ट्विट
सत्तेसाठी निर्लज्जतेचा कळस…
मालाड येथील क्रीडासंकुलाला टिपू सुलतानचे नाव देण्याचा कार्यक्रम पोलिस संरक्षणात
आणि
हिंदूंवर अनन्वित करणार्या टिपू सुलतानचे नाव न देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणार्या भाजपा,विहिंप,बजरंग दल कार्यकर्त्यांवर लाठीमार-अटक!
तीव्र निषेध❗️❗️❗️#Mumbai https://t.co/VsSj6u7zhR
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 26, 2022