शीला दीक्षित यांचे निधन; राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्याकडून आदरांजली

नवी दिल्ली : दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित यांच दीर्घआजाराने निधन झाले आहे. त्यांच्या निधनानंतर अनेक दिग्गज नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विटरव्दारे दीक्षित यांना आदरांजली वाहिली आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद –

पंतप्रधान नरेंद्र मोदी –

राहुल गांधी –

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी –

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल –

सलग तीनवेळा दिल्लीच्या मुख्यमंत्री

दिल्लीचं दिर्घकाळ मुख्यमंत्रीपद त्यांनी भुषवलं होतं. त्यांनी तब्बल १५ वर्ष दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा भार सांभाळत एक नवा विक्रम आपल्या नावावर केला होता. साल 1998 पासून सलग तीन वेळा त्या दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावर निवडून आल्या होत्या. परंतु 2013 साली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांनी त्यांचा दिल्ली विधानसभा मतदारसंघात पराभव केला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.