नवी दिल्ली – माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भाजपने वर्गणी गोळा करण्याची मोहीम सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनीही या मोहिमेदरम्यान पक्ष निधीसाठी 1000 रुपयांची देणगी देऊन समर्थकांना मदत करण्याचे आवाहन केले आहे.
Any donation to the @BJP4India is a contribution towards a stronger #NewIndia.
You can contribute through the 'Donation' module of the NaMo App.
I have done my part and appeal to all our supporters and karyakartas to donate and inspire others for the same. pic.twitter.com/T8h1lI26Mr
— Amit Shah (Modi Ka Parivar) (@AmitShah) December 25, 2021
अमित शहा यांनी म्हंटले की, “भाजपला दिलेली देणगी मजबूत न्यू इंडियासाठी महत्त्वपूर्ण योगदान आहे. तुम्ही नमो अॅपद्वारे योगदान देऊ शकता.” अमित शहांच्या या आवाहनानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्वीटरवर देणगी पावतीचा फोटो पोस्ट करत मदत करण्याचे आवाहन केले आहे. मोदी यांनी म्हंटले की, “भारतीय जनता पक्ष निधीसाठी मी एक हजार रुपये देणगी दिली आहे. सतत राष्ट्र प्रथम ठेवण्याचा आमचा आदर्श आणि आमच्या केडरची आजीवन नि:स्वार्थ सेवेची संस्कृती तुमच्या छोट्या देणगीमुळे अधिक दृढ होईल, भाजपला मजबूत बनवण्यासाठी मदत करा. भारताला मजबूत बनवण्यास मदत करा”.
I have donated Rs. 1,000 towards the party fund of the Bharatiya Janata Party.
Our ideal of always putting Nation First and the culture of lifelong selfless service by our cadre will be further strengthened by your micro donation.
Help make BJP strong. Help make India strong. pic.twitter.com/ENdytJYEj5
— Narendra Modi (@narendramodi) December 25, 2021
दरम्यान, भाजपला देणगी देण्याच्या अमित शहा आणि पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनावर अनेकांनी ट्विटरवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. भाजपच्या या कृतीवर विरोधकांकडून टीकाही करण्यात येत आहे. तसेच सर्वसाधारण नागरिकांकडूनही तिखट प्रतिक्रिया नोंदवल्या जात आहेत. एका वापरकर्त्याने (@GJyoti) ट्विटरवर लिहिले की, “आम्ही आधीच खूप कर भरत असताना आम्ही वेगळे दान का करावे? पेट्रोलचे दर, प्रवासखर्च, खाण्यापिण्याचे खर्च सगळेच दिवसेंदिवस वाढत आहे, तुम्ही लोक एवढा खर्च कुठे करताय?”