पुणे – राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पुणे शहर ओबीसी सेलच्या अध्यक्षपदी दीपक मारूती जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जगताप यांना नुकतेच ओबीसी सेलचे प्रदेश अध्यक्ष ईश्वर बाळबुंदे यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र देण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप , प्रवक्ते अंकुश काकडे यांच्या हस्ते जगताप यांचा सत्कार करण्यात आला .नगरसेवक वनराज आंदेकर, हरीश लडकत, सागर कोल्हे, सचिन बेनकर, किरण कद्रे यावेळी उपस्थित होते.
जगताप हे गेली 15 वर्षे पक्षात सक्रीय कार्यकर्ते असून या पूर्वी त्यांनी कसबा विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष, शहर सरचिटणीस तसेच पीएमपीच्या सभासद पदावर काम केलेले असून ते महात्मा फुले वसतिगृहाच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष आहेत. ओबीसी आरक्षण तसेच ओबीसीच्या न्याय हक्काबाबत या पदाच्या माध्यमातून जनजागृती तसेच लढा उभारणार असल्याचे जगताप म्हणाले.