सेंच्युरियन – न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेची विजयाने सांगत करत भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळण्यास सज्ज झाला आहे. उद्यापासून दोन्ही संघांदरम्यान मालिकेतील पहिला कसोटी सामना रंगणार आहे. मात्र भारतीय संघाच्या निवडीचे प्रश्न संघ व्यवस्थापनेसमोर पडले आहेत.
फलंदाज आणि गोलंदाज यांची अचूक सांगड घालताना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नेमकी संघ रचना कशी असावी हाच प्रश्न संघ व्यवस्थापन कसा हाताळतोय हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. पाच गोलंदाज खेळविण्यावर कर्णधार ठाम आहे. फक्त प्रश्न असा आहे की पाचवा गोलंदाज अष्टपैलू असावा की निव्वळ गोलंदाज याचे उत्तर अजून गवसलेले नाही.
त्यात फलंदाजांची निवड करताना पाचव्या क्रमांकासाठी अजिंक्य रहाणे की श्रेयस अय्यर यांच्यापैकी कुणाची निवड करायची याचेही उत्तर संघ व्यवस्थापनाला चोविस तासात शोधायचे आहे.दक्षिण आफ्रिका संघाची तशी फारशी ओळख नाही.
अनेक दिवसांत त्यांच्याविरुद्ध सामना न झाल्यामुळे कोण कसा खेळतो याचा अभ्यासच पहिल्या कसोटीत अपेक्षित आहे. अर्थात, हा संघ पूर्वी इतका ताकदवान नक्कीच राहिलेला नाही. त्यात अतंर्गत वर्णद्वेषी कलहामुळे तो विचारांनीही पोखरला गेला आहे.
द्रविडमुळे मनोसामर्थ्य उंचावले -अगरवाल
भारतीय संघातील स्थान पुन्हा मिळवण्यासाठी धडपडताना प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे मनोसामर्थ्य उंचावणारे मार्गदर्शन उपयुक्त ठरले, असे सलामीवीर फलंदाज मयांक अगरवालने सांगितले. इंग्लंडमधील पहिल्या कसोटीत दुखापतीमुळे माघार घ्यावी लागल्यानंतर कर्नाटकचा ३० वर्षीय फलंदाज मयांकने भारतीय संघातील स्थान गमावले. परंतु न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दिमाखदार पुनरागमन करताना मयांकने अनुक्रमे १५० आणि ६२ धावांच्या खेळी साकारल्या.
न्यूझीलंडचा कसोटी संघ :
टॉम लॅथम (कर्णधार), टॉम ब्लंडेल, ट्रेंट बोल्ट, डेव्हॉन कॉन्वे, मॅट हेन्री, कायले जेमिसन, डॅरिल मिचेल, हेन्री निकोल्स, रचिन रवींद्र, टिम साऊदी, रॉस टेलर, नील वॅगनर, विल यंग.
भारताचा कसोटी संघ:
विराट कोहली (कर्णधार), प्रियांक पांचाळ, केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, ऋषभ पंत (विकेटकीपर), रिद्धिमान साहा (विकेटकीपर), आर अश्विन, जयंत यादव, इशांत शर्मा, मोहम्मद. शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, मो. सिराज.