यूपीएससी टॉपर आयएएस टीना डाबी पुन्हा लग्न करणार असल्याची माहिती समोर आली आहे. याचा खुलासा त्यांनी स्वतः केला आहे. टीना यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पेजवर 2013 बॅचचे आयएएस प्रदीप गावंडेसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये लिहिले आहे ‘तू दिलेलं हास्य परिधान करत आहे’. प्रदीप गावंडे यांचादेखील हा दुसरा विवाह असेल. त्यांनी चुरु जिल्ह्याचे कलेक्टर म्हणून काम पाहीले आहे.
टीना यांनी 2018 मध्ये अतहर आमीरसोबत निकाह केला होता. मात्र अतहर व टीना यांचे नाते फार काळ टिकू शकले नाही. 2020मध्ये हे दोघे विभक्त झाले आहे. अतहर 2016 मध्ये झालेल्या यूपीएससी परिक्षेत देशात दुसरा आला होता. मसुरीमध्ये आयएएसच्या प्रशिक्षणादरम्यान टीना आणि अतहर यांच्यातील जवळीक वाढली होती. त्यानंतर हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते. दरम्यान त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. मात्र यांचे नाते फार काळ टिकले नाही व दोघेही वेगळे झाले.
दरम्यान, टीना आता पुन्हा लग्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. प्रदीप गावंडे यांचादेखील हा दुसरा विवाह असेल. आयएएस होण्याआधी प्रदीप यांनी एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण केलं. त्यांचा जन्म 9 डिसेंबर 1980 रोजी महाराष्ट्रात झाला. प्रदीप आणि टीना यांचा विवाह सोहळा 22 एप्रिलला जयपूरमधील एका हॉटेलमध्ये संपन्न होणार आहे.