भारत पाकमध्ये अणुयुध्द शक्‍य; इम्रानखान पुन्हा बरळले

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमध्ये काश्‍मीर प्रश्‍नावरील तणावाचे रुपांतर अणुयुध्दात होऊ शकते, अशी धमकीच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रानखान यांनी दिली. अल-जझीरा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

अण्वस्त्रधअरी देशांच्या युध्दाचा परिणाम विनाश हाच असतो, असा इशारा देत खान म्हणाले, पाकिस्तान विचार करता आम्ही आजपर्यंत पारंपरिक युध्द करत आहोत. त्यात आम्ही हारत आहोत. पण, देशाला स्वातंत्र्य अथवा शरणागती असे पर्याय निवडायची वेळ येते तेव्हा पाकिस्तानी नक्कीच अखेरच्या श्‍वासापर्यंत लढतील, अशी मला खात्री आहे.

पाकिस्तान भारताशी कधीच युध्द पुकारणार नाही, या विधानाचा पुनरूच्चार करत इम्रानखान म्हणाले, मी शांततावादी आहे. मी युध्दाविरोधातच आहे. हे स्पष्ट आहे. युध्दामुळे कोणत्याही समस्या सुटत नाहीत यावर माझा विश्‍वास आहे. पण जेव्हा दोन अण्वस्त्रधारी देश पारंपरिक युध्द सुरू होईल तेव्हा ते अणुयुध्दात कधीही परावर्तीत होऊ शकते.

संयुक्त राष्ट्रेने हा विनाश टाळण्यासाठकिृती करण्याची हीच वेळ आहे. त्यामुळेच आम्ही संयुक्त राष्ट्रेत धाव घेतली. आम्ही सर्व आमतरराष्ट्रीय व्यासपीठावर गेलो आहोत. आम्हास भारतीय उपखंडात विनाश होऊ द्यायचा नाही, अशी सारवासारवही त्यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.