जम्मू-काश्मीर : बालाकोटमध्ये जवानांनी भूसूरुंग केले निकामी

संग्रहित छायाचित्र

पूॅंछ – जम्मू काश्मीरमधील पूॅंछ जिल्ह्यातील बालाकोट या गावात जीवंत भूसूरुंग आढळल्याने खळबळ उडाली आहे. सैन्यदलाच्या एका टीमला हे भूसूरुंग आढळले आहेत. त्यानंतर घटनास्थळावरील हे भूसूरुंग या जवानांनी नष्ट केले आहेत. ही घटना शनिवारी संध्याकाळी बालाकोट या गावात घडली आहे.

दरम्यान सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. ते म्हणाले की “सैनिकांच्या या टीमने घटनास्थळावर हे भूसूरुंग आढळल्यानंतर एका सुरक्षित ठिकाणी नेऊन ते नष्ट केले”. त्यामुळे कोणतीही जिवितहानी किंवा वित्तहानी झाली नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)