IND vs PAK – भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज टी-२० विश्वचषकातील सामना खेळला जाणार आहे. मागील वर्षी झालेल्या स्पर्धेत पाकिस्तानने भारतीय संघाचा मोठ्या फरकाने पराभव केला होता. त्यामुळे आता त्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. तर दुसरीकडे भारतावर दुसऱ्यांदा मात करण्यासाठी पाकिस्तान संघ तयार असणार आहे. मेलबर्न येथील मैदानावर हा सामना खेळला जाणारा आहे. सामन्याअगोदर या ठिकाणी पावसाचा व्यत्यय येण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र सध्या वातावरण पूर्णपणे साफ असून सामन्यात कोणताही अडथळा येणार नसल्याचे चित्र दिसत आहे.
सामन्याच्या सुरुवातीला भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. खेळपट्टीवर सुरुवातीला गोलंदाजीला मदत होण्याची शक्यता आहे. भारतीय संघाच्या गोलंदाजांच्या कामगिरीवर सर्वांच्या नजर असणारा आहेत. त्याचबरोबर पाकिस्तानच्या फलंदाजीची भिंत असलेल्या मोहमद रिझवान आणि बाबर आझम यांना लवकर बाद करण्याचे आव्हान भारतीय गोलंदाजांसमोर असणार आहे.
India have won the toss and opted to field in Match 4 of the Super 12 stage 🏏
Who are you cheering for?#INDvPAK | 📝: https://t.co/H9EE5QNfGD pic.twitter.com/sMJ2f2sZAx
— ICC (@ICC) October 23, 2022
भारतीय संघ – रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार आणि अर्शदीप सिंग.
पाकिस्तान संघ – बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, शान मसूद, मोहम्मद नवाज, आसिफ अली, शादाब खान, हैदर अली, इफ्तिखार अहमद, हरिस रौफ, नसीम शाह आणि शाहीन शाह आफ्रिदी.