आशियाई बॅडमिंटन स्पर्धेत भारत पराभूत

नवी दिल्ली – भारतास कनिष्ठ आशियाई बॅडमिंटन स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीतच पराभवाचा धक्का बसला. मिश्र सांघिक प्रकारच्या या लढतीत इंडोनेशियाने त्यांचा 3-0 असा पराभव केला.

भारताच्या मैस्नाम मैराबाला बॉबी सेतियाबुदीकडून 17-21, 21-15, 21-11 अशी हार मानावी लागली. मुलींच्या एकेरीत मालविका बनसोड हिला इंडोनेशियाच्या पुत्री कुसुमा वार्दानी हिने 22-20, 21-17 असे पराभूत केले. दुहेरीत तनिषा क्रॅस्टो व सतीशकुमार यांना रॉली कार्नाडो व इंदाह काह्या जेमिल यांनी 21-15, 21-18 असे हरविले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)