India’s Tour of Australia :– भारतीय क्रिकेट संघ या वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलिया दौरा करणार आहे. या दौऱ्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. ही मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचाच भाग आहे.
या मालिकेतील पहिला सामना पर्थला होणार आहे. ( IND vs AUS 5 Match Test Series 2024-25 ) या व्यतिरिक्त ऍडलेड, ब्रिस्बेन, मेलबर्न आणि सिडनीत कसोटी सामने होणार आहेत. पहिला सामना पर्थला, तर दुसरा आणि तिसरा सामना अनुक्रमे ऍडलेड आणि ब्रिस्बेनला होईल. तसेच चौथा सामना बॉक्सिंग डे कसोटी सामना असेल, जो मेलबर्नला होईल, तर नवीन वर्षातील सामना अखेरचा आहे तो सिडनीत होईल.
ऍडलेडला होणारा सामना दिवस-रात्र कसोटी सामनाही खेळवला जाण्याची शक्यता आहे. पर्थमध्ये भारतीय संघ ६ वर्षांनी कसोटी सामना खेळणार आहे. यापूर्वी डिसेंबर २०१८ साली भारतीय संघाने पर्थमध्ये कसोटी सामना खेळला होता, ज्यात ऑस्ट्रेलियाने १४६ धावांनी विजय मिळवला होता. भारतीय संघ जवळपास ३२ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियामध्ये ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. यापूर्वी १९९१-९२ मध्ये भारताने ऑस्ट्रेलियात ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळली होती. या मालिकेत ऑस्ट्रेलियाने ४-० असा विजय मिळवला होता.
यापूर्वी भारतीय संघाने केलेल्या शेवटच्या दोन ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटी मालिकेत वर्चस्व राखले होते. भारताने २०१८-१९ मध्ये केलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताने कसोटी मालिका २-१ अशा फरकाने जिंकली होती. तसेच २०२०-२१ मध्ये केलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही भारताने कसोटी मालिका २-१ फरकाने जिंकली.