Hockey India’s Tour of Australia : – भारताचा हॉकी संघपुढील महिन्यात ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे. त्यासाठी भारतीय पुरुष हॉकी संघाचे प्रशिक्षक क्रेग फुल्टन यांनी १६ खेळाडूंऐवजी ऑलिम्पिक स्पर्धेसाठीच्या सर्व २७ संभाव्य खेळाडूंनाच निवडले आहे. भारतीय हॉकी संघ ऑलिम्पिकपूर्वी होणाऱ्या या दौऱ्यात पाच सामने खेळणार आहे. संघाचे कर्णधारपद हरमनप्रीत सिंगकडेच कायम राहीले आहे.
या खेळाडूंचे भुवनेश्वर येथे प्रशिक्षण शिबीर सध्या सुरू आहे. भारतीय संघ १ एप्रिलला ऑस्ट्रेलियासाठी रवाना होणार असून अनुक्रमे ६, ७, १०, १२, १३ एप्रिल रोजी पाच सामने खेळणार आहे. पाचही सामनेे पर्थ येथे होतील.
ऑलिम्पिकपूर्वी भारतीय संघ प्रो लीग हॉकीच्या बेल्जियम येथील टप्प्यात खेळणार असल्यामुळे फुल्टन यांना येथे खेळाडूंची चाचणी करण्याचा हा एक पर्याय उपलब्ध झाला आहे.
भारतीय हॉकी संघ – कृष्ण बहादूर पाठक, पी. आर. श्रीजेश, सूरज करकेरा, हरमनप्रीत सिंग (कर्णधार), जर्मनप्रीत सिंग, अमित रोहिदास, जुगराज सिंग, संजय, सुमित, अमीर अली, मनप्रीत सिंग, हार्दिक सिंग, विवेक सागर प्रसाद, समशेर सिंग, नीलकांत शर्मा, राजकुमार पाल, विष्णूकांत सिंग, आकाशदीप सिंग, मनदीप सिंग, ललित कुमार उपाध्याय, अभिषेक, दिलप्रीत सिंग, सुखजीत सिंग, गुरजंत सिंग, मोहम्मद राहिल मौसीन, बॉबी सिंग धामी, अराइजीत सिंग हुंदल.