नवी दिल्ली, दि. 25 – भारतातील एका दिवसांतील बाधितांची संख्या आज तब्बल 3 लाख 49 हजार 691 वर गेली आहे. त्यामुळे भारतातील एकूण करोना रुग्णांची संख्या आता 1 कोटी 69 लाख 60 हजार 172 वर गेली आहे. सध्या देशातील सक्रिय बाधितांची संख्या 26 लाखांवर केली असून ही आजवरची विक्रमी संख्या आहे.
गेल्या 24 तासांत करोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाणही 2767 पर्यंत गेले आहे. त्यामुळे करोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या एकूण 1 लाख 92 हजार 311 इतकी झाली आहे. कोविड रिकव्हरीचा दर 83.05 टक्क्यांवर आला आहे. दरम्यान याच काळात करोनामुळे बरे झालेल्या रूग्णांची संख्या 1 कोटी 40 लाख 85 हजार 110 दहा इतकी आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे आज ही माहिती सादर करण्यात आली आहे.