ढाका – जोमिमा रॉड्रीक्स व दीप्ती शर्मा यांची वादळी फलंदाजी व राजेश्वरी गायकवाडची भेदक गोलंदाजी यांच्या जोरावर भारताच्या महिला संघाने येथे सुरू असलेल्या महिलांच्या आशिया करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी अमिरातीचा 104 धावांनी पराभव केला. या स्पर्धेतील भारतीय संघाचा हा सलग तिसरा विजय असून आता आपल्या गटात भारतीय संघ अव्वलस्थानी आले आहे.
India continue their winning run at the #WomensAsiaCup2022 👏
📸: @BCCIWomen
Scorecard: https://t.co/cgoKnhTwDU pic.twitter.com/DJ4lXfrYaA
— ICC (@ICC) October 4, 2022
या सामन्यासाठी नियमित कर्णधार हरमनप्रीत कौरला विश्रांती देताना नेतृत्व स्मृती मानधनाकडे सोपवण्यात आले होते. तिने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर मानधना व शब्बीनेनी मेघना यांच्यासह हेमलता दयालन व पूजा वस्त्रकार यांनी साफ निराशा केली.
.@JemiRodrigues scored a superb 7⃣5⃣* & bagged the Player of the Match award as #TeamIndia beat UAE. 👏 👏 #AsiaCup2022 | #INDvUAE
Scorecard ▶️ https://t.co/Y03pcauSKo pic.twitter.com/h3TGNvduaO
— BCCI Women (@BCCIWomen) October 4, 2022
मात्र, दीप्ती शर्माने अफलातून 64 धावांची खेळी केली. तिने 49 चेंडूत 5 चौकार व 2 षटकार फटकावले. त्यानंतर सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेत जेमिमा रॉड्रीक्सने नाबाद 75 धावा करताना संघाला 20 षटकांत 5 बाद 178 अशी भक्कम धावसंख्या उभारून दिली. किरण नवगिरे 13 धावांवर नाबाद राहिली.
#WomensAsiaCup2022 | भारतीय महिलांचा मलेशियावर विजय, डकवर्थ-लुईसद्वारे निर्णय
विजयासाठी 179 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना तिर्था सथिशा पहिल्याच षटकात धावबाद झाली. त्यानंतर इशा ओझाही परतली. नताशा चेरिथनेही निराशा केली. यावेळी अमिरातीची अवस्था 3 बाद 5 अशी अत्यंत बिकट बनली होती. मात्र, कविशा एगोदेजने नाबाद 30 धावा करताना खुशी शर्मासह चौथ्या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी केली व संघाचे अर्धशतक फलकावर लावले. खुशी चांगली खेळत असताना 29 धावांवर बाद झाली. त्यानंतर कविशाने छाया मुगलसह उर्वरित षटके संथ फलंदाजी करत खेळून काढली. त्यांचा डाव 20 षटकांत 4 बाद 74 असा रोखला गेला. राजेश्वरी गायकवाडने 2 तर दयालन हेमलताने 1 गडी बाद केले.