दुबई –आशिया करंडक 19 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत भारत व पाकिस्तान या परंपरागत प्रतिस्पर्धी संघात नाताळच्या दिवशी म्हणजे 25 डिसेंबरला सामना होत आहे.
यंदाच्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत भारताच्या प्रमुख संघाचा पाकिस्तानकडून दारुण पराभव झाला. तेव्हापासून भारतीय चाहते वचपा कधी काढला जाणार याचीच वाट पाहत आहेत. येत्या 23 डिसेंबरपासून या स्पर्धेला प्रारंभ होत आहे. त्यातील भारताची सलामीची लढत दुबईत पाकशी होत आहे.
या सामन्यासाठी प्रेक्षकांची उत्सूकता शिगेला पोहोचली आहे. यश धुले भारताचा कर्णधार आहे. आशियाई क्रिकेट परिषदेने आयोजित केलेल्या स्पर्धेत 8 संघ सहभागी होत आहेत. ते दोन गटांमध्ये विभागले गेले आहेत.
अ गटात भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि अमिराती यांना स्थान मिळाले आहे. तर बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका आणि कुवेत हे ब गटात आहेत. प्रत्येक संघाला तीन साखळी सामने खेळायचे आहेत.