Hania Amir With Badhshah| प्रसिद्ध रॅपर आणि गायक बादशाह तरुण वर्गात लोकप्रिय आहे. त्याच्या गाण्यांमुळे त्याला मोठी लोकप्रियता मिळाली आहे. सध्या बादशाह वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वीच बादशाह पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरसोबत स्पॉट झाला होता, त्यानंतर दोघांच्या डेटिंगच्या अफवा पसरल्या होत्या. पुन्हा एकदा बादशाह आणि हानिया दुबईमध्ये एकत्र दिसले. सध्या हानिया आणि बादशाहचे दुबई ट्रीपचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
हानिया आमिरने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती बादशाहसोबत दिसत आहे. यात हानियाने शॉपिंग डेट आणि डिनरची झलक दाखवली आहे. या फोटोला हानियाने ‘चंदीगडहून रेसक्यू आला आहे,’ असे कॅप्शन दिले आहे. याशिवाय हानियाने एक क्यूट आणि मजेदार व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये बादशाह आणि ती गाणी गाताना दिसत आहेत. यात दोघेही खुश दिसत आहेत.
View this post on Instagram
बादशाह आणि हानिया यांनी त्यांच्या नात्याबद्दल अजून कोणतीही माहिती चाहत्यांना दिली नाही. पण त्यांच्या डेटिंगची चर्चा मात्र सध्या सोशल मीडियावर होत आहे. याआधीही हानिया आणि बादशाह दुबईमध्ये एकत्र दिसले होते. दोघांना एकत्र पाहून त्यांच्या डेटींगच्या अफवा पसरल्या होत्या. अनेक यूजर्सनी बादशाहला पाकिस्तानचा जावई असेही म्हटले होते. मात्र, या अफवांवर हानिया किंवा बादशाहने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दोघींना पुन्हा एकत्र पाहून सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.
View this post on Instagram
दरम्यान, हानिया ही पाकिस्तानी मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती इश्किया, फिर वही मोहब्बत, मेरे हमसफर, तितली, या मालिकांमध्ये दिसली आहे.
हेही वाचा:
शुभंकर-अमृताच्या लग्नात पुणेरी थाट; सुंदर लुकने वेधलं साऱ्यांचे लक्ष