रांची – येथे नुकत्याच पार पडलेल्या 15 वर्षांखालील मुला-मुलींच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राने फ्री-स्टाइल, ग्रिको रोमन व महिला या तिनही गटात सांघिक विजेतेपद मिळवले.
महाराष्ट्राने स्पर्धेत एकूण 19 पदकांची कमाई केली आहे. यामध्ये 7 सुवर्ण, 3 रजत आणि 9 ब्रॉंझपदकांचा समावेश आहे. फ्री-स्टाइल प्रकारात महाराष्ट्राच्या कुस्तीपटूंनी 4 सुवर्ण, 1 रजत आणि 2 ब्रॉंझपदकांची कमाई करून अव्वल स्थान मिळवले.
धनराज शिर्के (44 किलो वजनी गट), पंकज पाटील (48 किलो), तनिष्क कदम (62 किलो), ओमकार शिंदे (85 किलो) या चौघांनी सुवर्णयश मिळवले. शुभम आचफळने (52 किलो) रजतपदक जिंकले. सोहम कुंभार (41 किलो), रोहन पाटील (38 किलो) यांनी ब्रॉंझपदक प्राप्त केले.