बारामतीतील ‘त्या’ महिलांवर उपासमारीची वेळ…

बारामती (प्रतिनिधी) : वनविभागाच्या नर्सरीमध्ये गेली दहा वर्ष कंत्राटी पद्धतीने काम करत असलेल्या महिलांना कामावरून कमी केले असल्याने या महिलांनी सोमवार (दि.२७ )पासून वनविभागाच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. हाताला काम नसल्याने उपासमारीची वेळ आली असल्याचे महिलांनी यावेळी सांगितले. तालुक्यातील जळोची व पिंपळी येथील महिलांचा बेमुदत उपोषणात सहभाग आहे.

वनविभागाच्या नर्सरीमध्ये गेली दहा वर्ष मजूर म्हणून या महिला काम करत होत्या. मात्र या महिलांना सध्या कामावरून कमी करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक फटका बसल्याने या महिलांवर उपासमारीची वेळ आली आहे.

याबाबत पाठपुरावा करून देखील कामावर घेतले जात नाही. कामावर घ्यावे यासाठी वेगवेगळ्या राजकीय पदाधिकारी यांच्याकडे देखील विनवणी केली, मात्र कोणीही दखल घेतली नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देखील याबाबत तक्रार केली, त्यांनी तशा सूचना संबंधितांना दिल्या मात्र अद्याप कामावर घेतले नाही, असे उपोषण करता सविता झगडे यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.