कार्ला, (वार्ताहर) – मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारने अलिकडेच काढलेल्या सगेसोयरे अधिसुचनेचे कायद्यात रुपांतर करण्याच्या प्रमुख मागणीसाठी व विशेष अधिवेशनात ठराव मंजूर करण्यात यावा यासाठी १० फेब्रुवारी पासून बेमुदत उपोषण सुरु केले आहे.
या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी लोणावळा शहर व ग्रामीण परिसरातील संत तुकाराम झाड पादुका स्थान, वाकसई मंदिरात कार्ला येथील भाऊसाहेब हुलावळे व वेहरगाव येथील कैलास पडवळ या दोन उपोषणकर्त्यांनी देखील पुन्हा बेमुदत उपोषण सुरु केले आहे.
या उपोषणकर्त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी लोणावळा शहर व ग्रामीण परिसरातील बांधव उपोषणस्थळी भेट देत आहेत. तसेच भाऊसाहेब हुलावळे व कैलास पडवळ या उपोषणकर्त्यांनी मावळ विधानसभा मतदार संघाचे आमदार सुनील शेळके यांनी देखील मराठा आरक्षणाबाबत आपण विशेष अधिवेशनात सगेसोयरे आदेशाचे कायद्यात रुपांतर करण्यासाठी पाठींबा देऊन ठामपणे प्रश्न उपस्थीत करावा असे आवाहन केले आहे.