पवनानगर, (वार्ताहर) – पवन मावळातील पवना कृषक सेवा संस्थेच्या मुख्य प्रशासकपदी बाळासाहेब गोविंद दळवी तर उपप्रशासकपदी बाळासाहेब छबू धामणकर, सहाय्यक प्रशासकपदी विश्वनाथ शेडगे यांची निवड करण्यात आली आहे.
सहाय्यक निबंधक वडगाव मावळ यांच्याकडून राज्य शासनाच्या आदेशानुसार ही निवड करण्यात आली. यावेळी नामदेव दाभाडे, ज्ञानेश्वर ठाकर, संभाजी शिंदे, मारुती वाळुंज, नामदेव ठुले, किसन कदम, ज्ञानेश्वर निंबळे, सुदाम काळे, श्याम कडू पांडुरंग कडू, आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुख्य प्रशासक बाळासाहेब दळवी म्हणाले की, पवन मावळतील चाळीस गावांचे कार्यक्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांच्या हितासाठी असलेली संस्था तोट्यातून नफ्यात आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांना खते, औषधे, बी–बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार आहे.