मुंबई – अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. दररोज ब्लॉग लिहिण्याबरोबरच, बिग बी फेसबुक-ट्विटर आणि इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चांगलेच ऍक्टिव्ह असल्याचे दिसून येतात. सध्या बिग बी यांनी केलेली पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. नेहमी कविता आणि आपल्या कामाबाबत पोस्ट करणाऱ्या बिग बींनी यावेळी एक हटके व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्याचा संबंध सध्या सुरु असलेल्या उन्हाळ्याशी आहे.
अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये एक साधू दिसत आहे, ज्याने उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी जबरदस्त जुगाड केला आहे. साधूने डोक्यावर पंखा बांधला आहे, हा पंखा सोलर प्लेटद्वारे चालतो. सोलर प्लेटही त्याने आपल्या डोक्यावर अगदी व्यवस्थित बसवली आहे ज्याद्वारे हा पंखा चालताना दिसतो.
व्हिडिओमध्ये एक व्यक्ती साधूला हा पंखा उन्हात चालतो का?’, असे विचारताना दिसत आहे. साधू म्हणतात सूर्य जितका तेज असेल तितका हा पंख जोरात चालतो.हा व्हिडिओ शेअर करत बिग बींनी लिहिले की, ‘मदर ऑफ इन्व्हेंशन.. भारत माता कि जय’
View this post on Instagram
बिग बींच्या या पोस्टवर यूजर्सकडून अनेक कमेंट येत आहेत. सर्वजण साधूची स्तुती करत आहेत. यासोबतच हवामान बदलावरही लोक चिंता व्यक्त करत आहेत. बिग बींनी हा जुगाड संपूर्ण देशाला दाखवल्यामुळे अनेकजण हा व्हिडीओ शेअर करताहेत. यामुळे पंख्यावाले साधूबाबा अशी या फॅन वाल्या बाबांची सोशल मीडियावर ओळख निर्माण झाली आहे. साधू बाबांचा हा व्हिडीओ सध्या तूफान व्हायरल होतोय.