मुंबई – अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi kavi) तिच्या विनोदीशैलीमुळे खासकरून ओळखली जाते. अनेक मालिका, नाटक आणि चित्रपटांद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसते. याशिवाय ती जाहिरातींमध्ये देखील काम करताना दिसते. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या हेमांगीने नुकतेच चाहत्यांसोबत एक गुडन्यूज शेअर केली आहे. लवकरच हेमांगी आता बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे.
अमिताभ बच्चन अर्थात बिग बी यांच्या वाढदिवसानिमित्त हेमांगीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन खास पोस्ट शेअर केली आहे. या जाहिरातीत तिला बिग बींबरोबर काम करण्याची संधी मिळाली आहे. हेमांगीने या जाहिरातीच्या शूटिंगदरम्यानचे काही खास क्षण हेमांगीने व्हिडिओतून शेअर केले आहेत. या पोस्टमधून तिने “क्या कहॅूं की खुशी, आश्चर्य, घबराहट, shock, respect से है लब सिले हुए! जिथे शब्द संपतात…वाढदिवसाच्या शुभेच्छा अमिताभ सर”, असं म्हणत हेमांगीने बिग बींना शुभेच्छा दिल्या आहेत. तिच्या पोस्टनंतर हेमांगाचे अनेकांनी कौतुक केले आहे.
View this post on Instagram
हेमांगीला बिग बींसोबत पाहण्यासाठी चाहतेही आतुर आहेत. याआधी हेमांगीला क्रिकेटर युवराज सिंहबरोबर जाहिरातीत काम करण्याची संधी मिळाली होती. काही दिवसांपूर्वीच तिने याबाबत पोस्ट शेअर करत चाहत्यांना माहिती दिली होती. यात ती मासे विकणाऱ्या स्त्रीच्या वेशभूषेत दिसली होती. यानंतर आता अमिताभ बच्चन यांच्यासोबत ती दिसणार आहे. एकापेक्षा एक दिग्गज कलाकारांसोबत हेमांगी झळकत असल्याचे सध्या दिसत आहे.