मुंबई – अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या भव्य राम मंदिराचा (Ram Mandir) अभिषेक 22 जानेवारीला होणार असून, त्याचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. हा संपूर्ण कार्यक्रम 4 टप्प्यात विभागलेला आहे. या कार्यक्रमांसाठी देशभरातील महंत यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Modi ) हे देखील उपस्थित राहणार आहेत. मात्र या सोहळ्यासाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( uddhav thackeray ) यांना अद्याप निमंत्रण न मिळाल्याचे समोर आले आहे. यावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ( Ayodhya )
आयोध्येमध्ये बाबरी मशीद ( Babari mashid ) पाडली गेली त्यावेळी बाबरी कोणी पाडली याची जबाबदारी घेण्यासाठी कोणी तयार नव्हते अशात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thackeray ) यांनी ‘जर बाबरी शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्यांचा अभिमान आहे’ असं सडेतोड वक्तव्य केले होते. त्यामुळे देशाच्या राजकीय वर्तुळात शिवसेना ( Shivsena ) आणि अनेक शिवसैनिक यांचा संबंध राम मंदिराशी कायम स्वरूपी जोडला गेला. अशात राम मंदिर उभे राहताना शिवसेना (ठाकरे गट ) निमंत्रण नसल्याचे समोर आले आहे.
जानेवारीत होणाऱ्या या सोहळ्यासाठी सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांना देखील आमंत्रण देण्यात आल्याचे समजते. मात्र अद्याप उद्धव ठाकरे यांना आमंत्रण देण्यात आलेलं नाही असा सवाल माध्यमांनी खासदार संजय राऊत यांना विचारला असता ते म्हणाले,”उद्धव ठाकरेंना ते आमंत्रण देणार नाहीत. ज्या कारणासाठी आडवाणी यांना आमंत्रण दिलेला नाही.. कारण आम्ही सगळे त्या राम मंदिराच्या आंदोलनातील सहभागी आहोत. संपूर्ण शिवसेना स्वतः बाळासाहेब ठाकरे मी आम्ही स्वतः त्यातील एक आरोपी आहोत. असं राऊत यावेळी म्हणाले.
ज्यांनी राम मंदिरासाठी त्याग केला आहे मुरली मनोहर जोशी,आडवाणी,उद्धव ठाकरे असतील आम्ही सर्व जण असू आम्हा कोणालाही ते बोलावणार नाहीत याची आम्हाला खात्री आहे. ज्याचं कोणतही योगदान त्यासाठी नाही त्यांचा तो सोहळा आहे.. ज्यांचं आंदोलनात योगदान आहे त्यांना ते अयोध्येच्या सीमेवर देखील येऊ देणार नाहीत असं देखील राऊत यावेळी म्हणालेत.
उद्धव ठाकरे यांना आमंत्रण असणारच – जन्मभूमी तीर्थक्षेत्र विश्वस्त मंडळ
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राम जन्मभूमी प्रतिष्ठापना समारंभाचे निमंत्रण असणारच अशी माहिती राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र विश्वस्त मंडळाने दिली आहे. निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांना राम जन्मभूमी प्रतिष्ठापना सोहळ्याचे निमंत्रण देण्यात येणार आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोघांच्याही पक्षांना निवडणूक आयोगाने मान्यता दिलेली आहे त्यामुळेच उद्धव ठाकरे यांना राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण देण्यात येणार असल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलंय.