India Vs Australia ODI Series Result : ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने यजमान भारतीय महिला संघाचा तिसऱ्या व अखेरच्या एकदिवसीय सामन्यात तब्बल 190 धावांनी पराभव करत विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांची ही मालिका 3-0 अशी निर्विवाद जिंकताना एकमेव कसोटी सामन्यात झालेल्या पराभवाचा वचपा काढला. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेल्या 339 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा डाव 33 व्या षटकांत 148 धावांवर संपूष्टात आला.
Emphatic from the @AusWomenCricket who demolish India in Mumbai to seal a 3-0 whitewash!
Scorecard: https://t.co/S6Xtf7WjqM #INDvAUS pic.twitter.com/uZ6NENh6CC
— cricket.com.au (@cricketcomau) January 2, 2024
भारताकडून स्मृती मानधना (29), जेमिमा रॉड्रीक्स (25), दीप्ती शर्मा (नाबाद 25), रिचा घोष (19) व पुजा वस्त्रकार (14) यांनाच दोनअंकी धावा करता आल्या. ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजीत जॉर्जिया वेरहॅमने सर्वाधिक 3 बळी घेतले. याशिवाय मेगन शुट, अॅलाना किंग आणि अॅनाबेल सदरलँड यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. ऍशले गार्डनरला 1 यश मिळाले.
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाची कर्णधार एलिसा हिलीने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर फोब लेचफिल्डने कर्णधार हिलीसह 189 धावांची भक्कम सलामी दिली. या दोघींनी भारतीय गोलंदाजी फोडून काढली. या दोघंनी आपापली अर्धशतके फटकावली. हिली शतकाकडे कूच करत असतानाच 82 धावांवर बाद झाली. तीने या खेळीत 85 चेंडूत 4 चौकार व 3 षटकार फटकावले. लेचफिल्डने मात्र आपले शतक साकार केले. मात्र, शतक पूर्ण झाल्यावर ती 119 धावांवर माघारी परतली तिने या खेळीत 128 चेंडूंचा सामना करताना 16 चौकार व 1 षटकार खेचला.
IND W vs AUS W 3rd ODI : लिचफिल्डचं शानदार शतक; ऑस्ट्रेलियाचा भारतासमोर धावांचा डोंगर…
एलीस पेरीने थोडीफार चमक दाखवताना संघाचे द्विशतक फलकावर लावले. मात्र, ती बाद झाल्यावर भरात असलेल्या बेथ मुनी व ताहिला मॅकग्रा यांनी साफ निराशा केली. अश्ले गार्डनर व अनाबेल सदरलॅंड यांनी जबाबदारीने फलंदाजी करत धावफलक हलता ठेवला. गार्डनर 30 तर सदरलॅंड 23 धावा करून बाद झाल्या. त्यानंतर अलाना किंगने नाबाद 26 धावांची खेळी करताना जॉर्जिया वेरहॅमच्या साथीत संघाला त्रिशतकी धावांपेक्षा जास्त मोठी मजल मारून दिली. वेरहॅमने नाबाद 11 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाने 50 षटकांत 7 गडी गमावून 338 अशी भक्कम धावसंख्या उभारली. भारताच्या गोलंदाजांनी तब्बल 28 अवांतर धावा देत त्यांच्या धावसंख्येला हातभार लावला.
भारतीय संघाकडून श्रेयंका पाटीलने तीन आणि अमनजोत कौरने दोन गडी बाद केले. पूजा वस्त्राकर आणि दीप्ती शर्मा यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.