Axar Patel – टीम इंडिया सध्या श्रीलंकेविरुद्ध मायदेशात एकदिवसीय मालिका खेळात आहे. यानंतर भारताला न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय आणि टी-२० मालिका खेळायच्या आहेत. या मालिकांसाठी बीसीसीआयने संघांची घोषणा केली आहे. यामध्ये सलामीचा फलंदाज केएल राहुल आणि अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल या दोन्ही खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. यादरम्यान, केएल राहुल लग्नबंधनात अडकणार हे सर्वांनाच माहिती आहे. मात्र, दुसरीकडे अष्टपैलू अक्षर पटेलदेखील लग्न करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.
श्रीलंके विरुद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय संघाची श्री पद्मनाभस्वामी मंदिराला भेट; फोटो व्हायरल…
केएल राहुल याच महिन्यात २३ तारखेला अभिनेत्री अथिया शेट्टी हिच्याशी लग्न करणार आहे. मागील काही काळापासून या दोघांच्या नात्यांबाबत माध्यमांमध्ये अनेक बातम्या समोर आल्या होत्या. राहुल आणि अथिया यांनी दोघांनीही आपल्या नात्याबाबत काही दिवस खुलासा केला नव्हता. मात्र, काही काळानंतर त्यांनी या गोष्टींचा खुलासा केला. या दोघांच्या नात्याबाबत सुरुवातीपासूनच सर्वांना माहिती आहे. मात्र, अक्षर पटेल कोणाशी लग्न करणार आहे याबाबत कोणालाही माहिती नाही. कारण त्याच्या नात्याबाबत माध्यमांमध्ये किंवा चाहत्यांमध्ये कधीही चर्चा झाली नाही.
भारताचा अष्टपैलू अक्षर पटेल मेहा पटेल हिच्याशी लग्न करणार आहे. मेहाने अलीकडेच आपल्या इंस्टाग्राम खात्यावर अक्षर पटेलसोबतच्या नात्याबद्दल खुलासा केला. दोघेही मागील बऱ्याच काळापासून एकमेकांसोबत नात्यात असल्याची माहितीही आता समोर आली आहे. मेहा ही व्यवसायाने डायटीशियन आणि न्यूट्रिशनिस्ट असून ती डायट प्लॅन शेअर करत असते. त्याचबरोबर ती लोकांशी डायटशी संबंधित माहितीही शेअर करण्याचे काम करते.
अक्षर पटेल आणि मेहा पटेल हे दोघे लवकरच लग्न करण्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळेच त्याला आगामी काळात होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकांसाठी विश्रांती देण्यात आली आहे. या अष्टपैलू खेळाडूने मागील काही काळात भारतीय संघासाठी दमदार कामगिरी केली आहे. रवींद्र जडेजाच्या अनुपस्थितीत अक्षरने भारतीय संघासाठी गोलंदाजी आणि फलंदाजी अशा दोन्हीमध्ये चांगले योगदान दिले आहे. अक्षर पटेल ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी संघात पुनरागमन करणार आहे.