#SAvsIND 1st Test : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना मंगळवारपासून (26 डिसेंबर) सेंच्युरियन येथे खेळवला जाणार आहे. टीम इंडिया यावेळी अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी शिवाय जाणार आहे. विश्वचषकानंतर शमी पूर्णपणे तंदुरुस्त झालेला नाही आणि डाव्या टाचेच्या दुखापतीमुळे तो मालिकेतून बाहेर पडला आहे.
2021 मध्ये सेंच्युरियनमधील विजयात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे कसोटी मालिकेत मोहम्मद शमीची खूप उणीव भासणार आहे, असं कर्णधार रोहित शर्माने सामन्याच्या एक दिवस आधी मान्य केलं आहे. रोहितने सूचित केले की, मुकेश कुमार किंवा प्रसिद्ध कृष्णा प्लेइंग-11 मध्ये असतील. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांना मुकेश किंवा प्रसिद्ध यांची साथ मिळेल.
रोहितनं सांगितले की, “त्याने (मोहम्मद शमी) गेल्या काही वर्षांत भारतीय संघासाठी जे काही केले ते पाहता निश्चितच शमीची मोठी उणीव भासेल. मुकेश कुमार भारतासाठी कसोटी सामना खेळला आहे.तर प्रसिद्ध कृष्णाने अद्याप कसोटीत पदार्पण केलेले नाही.
हिटमॅन पुढे म्हणाला की, “प्रसिधला त्याच्या उंचीमुळे गोंलदाजीत चेंडू अधिक बाउन्स करू शकतो तर मुकेश चेंडू चांगल्याप्रकारे स्विंग करू शकतो. आज आम्हाला खेळपट्टी पाहायची होती, पण खराब हवामानामुळे आम्हाला खेळपट्टी पाहता आली नाही. खेळपट्टी पाहिल्यानंतर कोण खेळणार हे आम्ही ठरवू. आम्ही 75 टक्के ठरवले आहे आणि उर्वरित 25 टक्के आम्ही उद्या पाहू.
कसोटी मालिकेसाठी दोन्ही संघ:
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अभिमन्यू इसवरन, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, केएल राहुल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), प्रसिद्ध कृष्णा.
दक्षिण आफ्रिका : टेम्बा बावुमा (कर्णधार), टोनी डी जोर्गी, डीन एल्गर, एडन मार्कराम, कीगन पीटरसन, मार्को जॅन्सन, वायन मुल्डर, डेव्हिड बेडिंगहॅम (विकेटकीपर), ट्रिस्टन स्टब्स (विकेटकीपर), काइल वेरेयन, नांद्रे बर्गर, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, लुंगी न्गिडी, कागिसो रबाडा.