IND vs ENG 3rd Test Day 2 (Rajkot Test) : राजकोट कसोटीत टीम इंडियाचा पहिला डाव 445 धावांवर आटोपला. त्यानंतर इंग्लंडची फलंदाजी सुरु होण्यापूर्वीच त्यांची बिनबाद 5 ही धावसंख्या होती. यामुळे चाहत्यांना चांगलेच आश्चर्य वाटले. इंग्लंडचा डाव 5/0 च्या स्कोअरने का सुरू झाला? यावर आयसीसीचे काय नियम आहेत? खरं तर; रवी अश्विनची एक चूक भारतीय संघाला महागात पडली. मात्र, पहिल्याच दिवशी याची सुरुवात झाली होती. त्यावेळी अंपायरने रवींद्र जडेजाला ताकीद दिली होती.
राजकोट कसोटीच्या दुसऱ्या दिवशी रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव बाद झाल्यानंतर रविचंद्रन अश्विन आणि ध्रुव जुरेल क्रीजवर होते. भारतीय डावाच्या 102 व्या षटकात फिरकीपटू रेहान अहमद गोलंदाजी करत होता, रवी अश्विन फलंदाज म्हणून स्ट्राइकवर होता… यानंतर रवी अश्विन शॉट खेळून धावा काढण्यासाठी धावला. मात्र ध्रुव जुरेलने रवी अश्विनला माघारी पाठवले.यादरम्यान, रवी अश्विनने खेळपट्टीवरील धोक्याच्या भागातून (डेंजर एरिया) धाव घेतली. यानंतर पंचांनी नाराजी व्यक्त केली. तत्पूर्वी, पंच पॉल विल्सन यांनी पहिल्या दिवशी रवींद्र जडेजा आणि सर्फराज खान यांना याचबाबतीत ताकीद दिली होती.
England will begin their innings with a five-run advantage 👀
Details 👇#WTC25 | #INDvENGhttps://t.co/v0eshb1xXk
— ICC (@ICC) February 16, 2024
भारताची फलंदाजी सुरु असताना पंचांनी वारंवार ताकिद देऊनही त्यांनतर एकेरी किंवा दुहेरी धाव घेत असताना अश्विन खेळपट्टीवरूनच धावत होता. त्यामुळेच त्याला म्हणजेच संपूर्ण संघाला 5 धावांचा दंड करण्यात आला. रवी अश्विनने खेळपट्टीवरील डेंजर एरियातून धाव घेतल्यानंतर अंपायरने नियमानुसार विरोधी संघाला म्हणजेच इंग्लंडला 5 धावा देण्याचा निर्णय घेतला. कारण याआधी रवींद्र जडेजा आणि सरफराज खान यांना याबाबत अशी ताकीद मिळाली होती. त्यामुळे अंपायर दुसऱ्यांदा असे घडल्याने पेनल्टी दिली.
IND vs ENG 3rd Test Day 2 : रोहित-जडेजाचे शतक; टीम इंडियाचा पहिला डाव 445 धावांवर आटोपला..
आयसीसीच्या नियमांनुसार, फलंदाजी करणाऱ्या संघाच्या खात्यातून एकही धाव कापली जात नाही, परंतु जेव्हा दुसरा संघ फलंदाजीला सुरुवात करतो, तेव्हा डाव सुरू होताच त्याच्या खात्यात 5 धावा जमा होतात. उदाहरणार्थ, जेव्हा इंग्लंडने डाव सुरू केला तेव्हा त्याला 5 अतिरिक्त धावा मिळाल्या. त्यामुळे इंग्लंडची फलंदाजी सुरु होण्यापूर्वीच त्यांची बिनबाद 5 ही धावसंख्या होती.