IND vs ENG 1st Test Day 4,Live Cricket Score : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या हैदराबाद कसोटीचा आज चौथा दिवस आहे. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर खेळवला जात आहे. इंग्लंडने पहिल्या डावात 246 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने 436 धावा करत आघाडी घेतली. दुसऱ्या डावात इंग्लंडने 420 धावा केल्या आणि भारतासमोर 231 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
विजयासाठी 231 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाच्या 119 धावांवर सात विकेट पडल्या आहेत. श्रेयस अय्यर 31 चेंडूत 13 धावा करून धावबाद झाला. जॅक लीचने त्याला जो रूटकरवी झेलबाद केले.
1ST Test. WICKET! 40.2: Shreyas Iyer 13(31) ct Joe Root b Jack Leach, India 119/7 https://t.co/HGTxXf8b1E #INDvENG @IDFCFIRSTBank
— BCCI (@BCCI) January 28, 2024
आता रविचंद्रन अश्विन आणि श्रीकर भरत क्रीजवर आहेत. हे दोघेही फलंदाजी करण्यास सक्षम आहेत, परंतु दोघांसाठी 100 धावांची भागीदारी करणे फार कठीण जाईल. त्याआधी भारताची सहावी विकेट 119 धावांवर पडली. रवींद्र जडेजा 20 चेंडूत दोन धावा करून धावबाद झाला. स्टोक्सच्या अचूक थ्रोने त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
IND vs ENG : भारताचा अर्धा संघ परतला पॅव्हेलियनमध्ये….
भारताची पहिली विकेट 42 धावांवर पडली. यशस्वी जैस्वाल 35 चेंडूत 15 धावा करून बाद झाला. टॉम हार्टलीने त्याला ऑली पोपकडे झेलबाद केले. भारताची दुसरी विकेट 42 धावांवरच पडली. शुभमन गिलला खातेही उघडता आले नाही. टॉम हार्टलीने त्याला ऑली पोपकडे झेलबाद केले. त्याने एकाच षटकात दोन विकेट घेत भारतीय संघाला अडचणीत आणले. भारताची तिसरी विकेट 63 धावांवर पडली. टॉम हार्टलीने रोहित शर्माला विकेट्ससमोर पायचीत केले. रोहितने 58 चेंडूत 39 धावा केल्या. भारताची चौथी विकेट 95 धावांवर पडली. अक्षर पटेल 42 चेंडूत 17 धावा करून बाद झाला. टॉम हार्टलीने त्याला त्याच्याच चेंडूवर झेलबाद केले. हार्टलीची चौथी विकेट होती. टीम इंडियाने केवळ 107 धावांवर पाचवी विकेट गमावली. केएल राहुल 22 धावा करून बाद झाला. राहुलला जो रूटने एलबीडब्ल्यू आऊट केले.
इंग्लंडचा दुसरा डाव 420 धावांवर संपला….
इंग्लंडने दुसऱ्या डावात 420 धावा केल्या आहेत. जसप्रीत बुमराहने ऑली पोपला क्लीन बोल्ड करत इंग्लंडचा डाव संपवला. पोपने 278 चेंडूत 196 धावा केल्या, पण द्विशतक हुकले. मात्र, त्याच्या या खेळीच्या जोरावर इंग्लंडने भारतासमोर 231 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
Ollie Pope’s incredible innings of 196 has helped England set a competitive target for the hosts 👊
Can India chase this down?#WTC25 | #INDvENG: https://t.co/E53vcqjfHE pic.twitter.com/up0AjxmDCL
— ICC (@ICC) January 28, 2024
इंग्लंडकडून दुसऱ्या डावात पोपच्या 196 धावाव्यतिरिक्त बेन डकेटने 47 धावांचे, टॉम हार्टलेने 34, बेन फॉक्सने 34, जॅक क्रॉलीने 31 आणि रेहान अहमदने 28 धावांचे योगदान दिले. भारताकडून जसप्रीत बुमराहने चार आणि रविचंद्रन अश्विनने तीन विकेट घेतल्या. रवींद्र जडेजाने दोन आणि अक्षर पटेलने एक विकेट घेतली.