World Cup 2023 Travis Head On Rohit Sharma: ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा एकदिवसीय विश्वचषक ट्रॉफी जिंकली. सलामीवीर ट्रॅव्हिस हेड ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा हिरो ठरला. ट्रॅव्हिस हेडने 120 चेंडूत 137 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 15 चौकार आणि 4 षटकार मारले. या शानदार खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने फायनल सहज जिंकली. तसेच ट्रॅव्हिस हेड विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात शतक ठोकणारा तिसरा ऑस्ट्रोलियन फलंदाज ठरला. यापूर्वी रिकी पाँटिंग आणि अॅडम गिलख्रिस्ट यांनी विश्वचषकाच्या अंतिम फेरीत शतके झळकावण्याचा पराक्रम केला होता. त्याचवेळी या विजयानंतर ट्रॅव्हिस हेडने भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माबाबत विधान केले.
ट्रॅव्हिस हेडने सामना जिंकल्यानंतर प्रतिक्रिया देताना सांगितले की, रोहित शर्मा सध्या जगातील सर्वात दुर्दैवी कर्णधार ठरला आहे. मी क्षेत्ररक्षणात खूप मेहनत घेतली. पण मी शतकाचा विचार करत नव्हतो. तो झेल पकडणे सोपे नव्हते अशी ट्रॅव्हिस हेडने रोहित शर्माच्या झेलवर आपली प्रतिक्रिया दिली. खरंतर रोहित शर्मा चांगली फलंदाजी करत होता. रोहित शर्माने 31 चेंडूत 47 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 4 चौकार आणि 3 षटकार मारले, मात्र ग्लेन मॅक्सवेलच्या चेंडूवर ट्रॅव्हिस हेडने अप्रतिम झेल घेतला. त्यानंतर संपूर्ण स्टेडियममध्ये शांतता पसरली.
ट्रॅव्हिस हेडने टीम इंडियाला एकही संधी दिली नाही…
ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 241 धावांचे लक्ष्य होते. डेव्हिड वॉर्नरशिवाय मिचेल मार्श आणि स्टीव्ह स्मिथ लवकर पॅव्हेलियनमध्ये परतले. एकेकाळी ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 3 विकेट आणि 48 धावा होती. भारतीय गोलंदाज दमदार पुनरागमन करतील असे वाटत होते, पण ट्रॅव्हिस हेड आणि मार्नस लॅबुशेन यांनी टीम इंडियाला एकही संधी दिली नाही. ट्रॅव्हिस हेड आणि मार्नस लॅबुशेन यांच्यात 192 धावांची भागीदारी झाली. मार्नस लॅबुशेन 110 चेंडूत 58 धावा करून नाबाद पॅव्हेलियनमध्ये परतला.