#INDvAUS T20 series : वर्ल्डकपनंतर आता भारत Vs ऑस्ट्रेलिया टी-20 सामन्यांत भिडणार, जाणून घ्या… मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक
Updated On:

India vs Australia T20 series : एकदिवसीय सामन्यांची विश्वकरंडक स्पर्धा पार पडली. मात्र, भारतीय संघाचा व्यस्त कार्यक्रम काही थांबणार नाही. आता येत्या गुरुवारपासून भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच टी-20 सामन्यांची मालिका सुरु होत आहे. या पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना विशाखापट्टणम येथे होणार आहे.
विश्वकरंडक स्पर्धेतील अनेक खेळाडूंना या मालिकेसाठी विश्रांती देण्यात येणार असल्याचे संकेत बीसीसीआयने दिले आहेत. कारण ही मालिका पार पडल्यावर लगेचच भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ तीन टी-20, तीन एकदिवसीय सामने तसेच दोन कसोटी सामने खेळणार आहे.
विश्वकरंडक स्पर्धेला प्रारंभ होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाने भारतात भारताविरुद्ध एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली होती व विश्वकरंडक संपल्यावर टी-20 मालिकाही आता वेळापत्रकानूसार होणार आहे.
टी-20 मालिकेचे वेळापत्रक (सर्व सामने संध्यासाठी 7 पासून)
पहिला सामना – 23 नोव्हेंबर, विशाखापट्टणम
दुसरा सामना – 26 नोव्हेंबर, तिरुअनंतपूरम
तिसरा सामना – 28 नोव्हेंबर, गुवाहाटी
चौथा सामना – 1 डीसेंबर, नागपूर
पाचवा सामना – 3 डीसेंबर, हैदराबाद





