IND vs AUS Final – भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS Final) यांच्यातील विश्वचषकाचा अंतिम सामना रविवारी (19 नोव्हेंबर) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stedium) होणार आहे. दोन्ही संघ 20 वर्षांनंतर अंतिम फेरीत आमनेसामने येणार आहेत.
गेल्या वेळी 2003 मध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला (India Vs Australia) हरवून विजेतेपद पटकावले होते. हा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये 1.25 लाख प्रेक्षक उपस्थित राहणार आहेत. त्याच्याशिवाय अनेक सेलिब्रिटी येण्याची शक्यता आहे. तर काही जण मित्रपरिवारासोबत एकत्र बसून हा हायव्होल्टेज ड्रामा पाहणार आहेत.
एकूणच काय तर, अंतिम सामन्याकडे प्रत्येक जण सोहळा म्हणून बघत त्याचा आनंद लुटणार आहे. भारतीय संघाचा विजय होण्यासाठी मराठी चित्रपट दिग्दर्शक-लेखक प्रवीण तरडे (pravin tarde) चक्क उद्या सकाळी पूजा करण्यास असल्याचं सांगण्यात आलं आहे.
या विषयी बोलताना प्रवीण तरडे (pravin tarde) म्हणाले की, “आजपर्यंतच्या क्रिकेट इतिहासामध्ये सध्याचा भारतीय संघ सर्वोत्तम आणि सर्वोत्कृष्ट आहे. अंतिम सामन्यात राहुल, बुमराह आणि कुलदीपकडून मला चमकदार कामगिरीची अपेक्षा आहे.
मी अंतिम सामन्याच्या सकाळी पूजा करणार आहे. त्यादिवशी मी जुन्नरला शेतकऱ्यांच्या एका कार्यक्रमासाठी जाणार आहे. पण सामना मोबाइलवर पाहणं सुरूच असेल.
तिथून ठाण्यात येऊन ‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे भाग 2’ चित्रपटाच्या टीमसोबत सेटवर सामना पाहेन. आमच्या सिनेमाचा निर्माता मंगेश देसाई भारताच्या विश्वचषक जेतेपदाच्या सेलिब्रेशनसाठी विशेष आयोजन करणार आहे. असं देखील तरडे यावेळी म्हणाले.