पुणे – गेल्या काही दिवसांपासून नामदेव जाधव (Namdev Jadhav) हे शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर सातत्याने टीका करत होते. मराठा आरक्षणावरून नामदेव जाधव हे आक्रमकपणे आपली भूमिका मांडत होते. आज पुण्यात ते आले असता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या (Sharad Pawar group) कार्यकर्त्यांनी जाधव यांना काळं फासलं.
आज पुण्यात नामदेव जाधव यांचा भांडारकर इन्स्टिट्यूटला (Bhandarkar institute) कार्यक्रम होता. सिंगापूरमध्ये शिवजयंती साजरी होणार, असा हा कार्यक्रमाचा विषय होता. मात्र डेक्कन पोलिसांनी नामदेव जाधव (Namdev Jadhav Vs Ncp) यांच्या कार्यक्रमाची परवानगी नाकारली होती. कारण राष्ट्रवादीकडून नामदेव जाधव यांना काळं फासण्याचा इशारा देण्यात आला होता.
शरद पवारांबद्दल नामदेव जाधव यांनी जे वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्याचा निषेध म्हणून शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. जाधव हे माध्यमांशी बोलत असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जाधव यांच्या तोंडाला काळं फासलं आणि मारहाण करण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादी युवक कार्यकर्त्यांनी यावेळी तुफान राडा केला. दरम्यान या प्रकरणानंतर नामदेव जाधव यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे.
याप्रकरणावर नामदेव जाधव यांची प्रतिक्रिया पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://fb.watch/ooq6ddNhGt/?mibextid=RUbZ1f