IND vs AUS Final – क्रिकेट मॅच म्हंटल कि प्रेक्षकांचा जल्लोष हा होतोच. त्यासोबत मैदानावर असतो स्पीकर्सचा आवाज.. गाणी आणि रंगेबेरंगी लायटिंग. गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (narendra Modi Stedium) होणाऱ्या भारत आणि ऑस्ट्रेलिया (Ind Vs Aus) सामन्यासाठी खास कोल्हापूरचा तरुण आपले लेझर लायटिंगचे कर्तब दाखवणार आहे.(laser show in final match)
भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS Final) यांच्यातील विश्वचषकाचा अंतिम सामना रविवारी (19 नोव्हेंबर) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stedium) होणार आहे. दोन्ही संघ 20 वर्षांनंतर अंतिम फेरीत आमनेसामने येणार आहेत.यावेळी मैदानात खेळापुर्वी अनेक शो आणि कार्यक्रम देखील पार पडणार आहेत. याचदरम्यान कोल्हापूरचा तरुण रामकृष्ण वागराळे (Ramkrushna wagrale) मैदानावर आपली लेझरबाजी सादर करणार आहे.(laser show)
सामन्यापूर्वी काही खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वर्ल्डकपच्या मॅचच्या आधी एक एअर शो (Air Show) होणार आहे. इंडियन एअरफोर्सने या शोचं आयोजन केलं आहे. त्यासाठी दुपारी 1.30 पासून 1.50 ची वेळ देण्यात आली आहे.मैदानावर असलेल्या सर्व प्रेक्षकांसह जगभरातील थेट प्रक्षेपण पाहणाऱ्याना कोल्हापूरच्या खास तरुणाचा शो पाहायला मिळणार आहे.
रामकृष्ण वागराळे यांनी यापूर्वी अयोध्या आणि उज्जेन येथे देखील अनेक लेझर शो केले आहेत. २०११ पासून ते या लाईट लेझरचा व्यवसाय करत आहेत. यंदा नरेंद्र मोदी स्टेडियमवर सर्वाधिक ४० लेझर लावून ते एक नवा विक्रम करणार आहेत.