World Cup 2023 : विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियावर पैशांचा पाऊस, तर…पराभूत होऊनही Team India ला मिळाले करोडो रुपये…

World Cup 2023 Prize Money : ऑस्ट्रेलियाने आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 चे विजेतेपद पटकावले आहे. 19 नोव्हेंबर (रविवार) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा सहा गडी राखून पराभव केला. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी 241 धावांचे लक्ष्य दिले होते, जे पॅट कमिन्सच्या संघाने 43 षटकात पूर्ण केले. ऑस्ट्रेलियन संघ 50 षटकांच्या क्रिकेटमध्ये सहाव्यांदा चॅम्पियन बनला आहे.
ऑस्ट्रेलियाने यापूर्वी 1987, 1999, 2003, 2007 आणि 2015 मध्ये विजेतेपद पटकावले होते. क्रिकेट विश्वचषक 2023 चे विजेतेपद पटकावल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघावर पैशांचा पाऊस पडला आहे. विजेत्या संघ ऑस्ट्रेलियाला बक्षीस म्हणून 40 लाख डॉलर (सुमारे 33.33 कोटी रुपये) मिळाले आहेत.
Best of the best 😍
Revealing the official CWC23 Team of the Tournament 👇https://t.co/WBmJnsdZ0e
— ICC (@ICC) November 20, 2023
उपविजेत्या टीम इंडियाला बक्षिसाची रक्कमही चांगली मिळाली. भारताला उपविजेते म्हणून 20 लाख डॉलर्स (सुमारे 16.65 कोटी रुपये) मिळाले आहेत. याशिवाय या दोन्ही संघांना साखळी टप्प्यातील सामने खेळण्यासाठी पैसेही मिळाले.
क्रिकेट विश्वचषक पुरस्काराची रक्कम (भारतीय रुपयांमध्ये)
• विश्वचषक विजेता: सुमारे 33 कोटी रुपये (ऑस्ट्रेलिया)
• विश्वचषक उपविजेता: रु. 16.65 कोटी (भारत)
• उपांत्य फेरी : 6.66 कोटी (दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड)
• साखळी फेरीतील प्रत्येक विजय: रु. 33.31 लाख
भारतीय संघाला मिळाली इतकी रक्कम…
फायनलमध्ये पोहोचल्याचे टीम इंडियाला20 लाख डॉलर मिळाले. तसेच लीग स्टेजमध्ये टीम इंडियाने सर्व 10 सामने जिंकले होते, ज्यामुळे त्यांना चार लाख डॉलर्स (सुमारे 3.33 कोटी रुपये) बक्षीस रक्कम देखील मिळाली होती. म्हणजेच या विश्वचषकात भारताला एकूण 24 लाख डॉलर्स (सुमारे 20 कोटी रुपये) बक्षीस मिळाले.
Heads high, hearts proud 🇮🇳#CWC23 pic.twitter.com/K5X67lvjgt
— ICC (@ICC) November 19, 2023
दरम्यान, क्रिकेट विश्वचषक सुरू होण्यापूर्वीच आयसीसीने बक्षिसाची रक्कम जाहीर केली होती. विश्वचषक स्पर्धेसाठी एकूण 10 मिलियन डॉलर्स (सुमारे 83.29 कोटी रुपये) बक्षीस रक्कम निश्चित करण्यात आली होती, जी सर्व 10 संघांमध्ये वेगवेगळी वाटली जाणार होती. त्यानुसार क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या संघाला 4 मिलियन डॉलर्स, उपविजेत्या संघाला 2 मिलियन डॉलर्स मिळणार होते. उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या दोन्ही संघांना प्रत्येकी 8 लाख डॉलर देण्याची तरतूद होती. तर ग्रुप स्टेजमध्ये प्रत्येक विजयासाठी 33.31 लाख रुपयांची बक्षीस रक्कम निश्चित करण्यात आली होती.





