नवी दिल्ली – ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघाच्या फलंदाजीचा प्रमुख आधारस्तंभ विराट कोहलीच राहणार आहे, असे मत भारताचे माजी कसोटीपटू व समालोचक आकाश चोप्रा यांनी व्यक्त केले आहे. कोहलीने एकदिवसीय तसेच टी-20 क्रिकेटमधील गेल्या दोन तीन मौसमांत राहिलेला शतकाचा दुष्काळ संपवला आहे. मात्र, गेल्या तीन वर्षांत कोहलीचे कसोटी शतक साकार झालेले नाही.
#INDvsAUS 2023 | ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत कोहलीला ‘विराट’ विक्रमाची संधी
यंदाची चार कसोटी सामन्यांची मालिका त्याच्यासाठी ही मोठी संधी आहे. जेव्हा ऑस्ट्रेलिया किंवा पाकिस्तानविरुद्ध सामना असतो तेव्हा एक वेगळाच कोहली पाहायला मिळतो. त्यातही ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याची देहबोलीही खूप सकारात्मक असते, असेही चोप्रा म्हणाले.
कोहलीची त्यांच्याविरुद्धची कामगिरी त्याची महानता सिद्ध करते.
#INDvsAUS । भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी शेन वॉटसनचा ऑस्ट्रेलियन संघाला गुरुमंत्र, म्हणाला…
त्याने आजवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकूण 20 कसोटी सामने खेळले आहेत. त्यात 36 डावांत जवळपास 48 च्या सरासरीने 1 हजार 682 धावा केल्या आहेत. त्यात 7 शतके व 5 अर्धशतके फटकावलेली आहेत. 169 ही त्याची आजवरची सर्वोत्तम धावसंख्या ठरली आहे. आता चाहत्यांना त्याच्या शतकांची अपेक्षा आहे.