नागपूर – भारतीय संघाचा प्रमुख फलंदाज व माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध येथे होत असलेल्या पहिल्या कसोटीत विक्रमी कामगिरी करण्याची संधी आहे. त्याने या कसोटीत 64 धावा केल्या तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या 25 हजार धावा पूर्ण होणार आहेत.
#INDvsAUS । भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी शेन वॉटसनचा ऑस्ट्रेलियन संघाला गुरुमंत्र, म्हणाला…
कोहलीने हा पल्ला पार केला तर सध्या खेळत असलेल्या क्रिकेटपटूंमध्ये ही कामगिरी करणारा तो पहिलाच क्रिकेटपटू बनेल. तसेच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनंतर दुसऱ्या क्रमांकाची कामगिरी करणारा व सध्या खेळत असलेला भारताचा दुसराच फलंदाज ठरणार आहे. कोहलीच्या नावावर आत्ता 24 हजार 936 धावा असून त्याला हा पल्ला पार करण्यासाठी 64 धावांची गरज आहे. सचिनच्या नावावर 34 हजार 357 धावांची नोंद आहे.
सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
– सचिन तेंडुलकर (भारत) – 34357 रन
– कुमार संगकारा (श्रीलंका) – 28016 रन
– रिकी पॉंटिंग (ऑस्ट्रेलिया) – 27483 रन
– महेला जयवर्धने (श्रीलंका) – 25957 रन
– जॅक कॅलिस (साउथ अफ्रीका) – 25534 रन
– विराट कोहली (भारत) – 24936 रन
सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके
– सचिन तेंडुलकर (भारत) – 100
– विराट कोहली (भारत) – 74
– रिकी पॉंटिंग (ऑस्ट्रेलिया) – 71
– कुमार संगाकारा (श्रीलंका) – 63
– जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रीका) – 62
– हाशिम अमला (दक्षिण आफ्रीका) – 55