India Vs Australia 4th T20I Cricket Match Live Score : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील चौथा सामना रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरू आहे. सध्या टीम इंडिया मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. हा सामना जिंकून मालिका जिंकण्याचा भारताचा प्रयत्न असेल. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाला सलग दुसरा सामना जिंकून मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधायची आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
भारतानं प्रथम फलंदाजी करताना रिंकू सिंग, यशस्वी जैस्वाल, जितेश शर्मा आणि ऋतुराज गायकवाड यांच्या खेळीच्या जोरावर निर्धारित 20 षटकात 9 बाद 174 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 175 धावाचं आव्हान असेल. या सामन्यात टीम इंडियाची स्थिती चांगली होती, पण भारताने शेवटच्या दोन षटकात पाच विकेट गमावल्या आणि ऑस्ट्रेलियासमोर 175 धावांचे लक्ष्य ठेवले.
Innings break!
Rinku Singh top-scores with 46 as #TeamIndia set a 🎯 of 175 👌
Second innings coming up shortly ⏳
Scorecard ▶️ https://t.co/iGmZmBsSDt#TeamIndia | #INDvAUS | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/4q17vMLbBi
— BCCI (@BCCI) December 1, 2023
या मैदानात कांगारू संघ हे लक्ष्य सहज गाठू शकतो. या सामन्यात टीम इंडियाला शेवटच्या दोन षटकात केवळ 13 धावा करता आल्या आणि पाच विकेट गमावल्या. त्यामुळे भारताची धावसंख्या 200 धावांच्या जवळपास पोहोचू शकली नाही.
भारताकडून रिंकू सिंगने 29 चेंडूत 4 चौकार अन् 2 षटकारासह सर्वाधिक 46 धावा केल्या. यशस्वी जैस्वालने 28 चेंडूत 37 आणि जितेश शर्माने 19 चेंडूत 35 धावांचे योगदान दिले. रुतुराज गायकवाड 28 चेंडूत 32 धावा करून बाद झाला. तर कर्णधार सूर्यकुमार यादव केवळ 1 आणि श्रेयस अय्यर 8 धावा काढून माघारी परतले.
ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजीत बेन डॉरिसने सर्वाधिक तीन तर तनवीर संघा-जेसन बेहरेनडॉर्फ यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. अॅरॉन हार्डीला एक विकेट मिळाली.