व्हीव्हीपॅट मशिन्सची संख्या पाचपटीने वाढवा – सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रायल) मशिन्सची संख्या पाचपटीने वाढविण्यास सांगितले आहे. सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील ५ मतदान केंद्रात व्हीव्हीपॅट मशिन्सची उपलब्ध करण्याचे आदेश दिले आहेत.

निवडणूक आयोगाकडून एका मतदार संघातील कोणत्याही एका मतदान केंद्रातून व्हीव्हीपॅट मशिन्सच्या आधारे मतमोजणी केली जाते. परंतु आता सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील ५ मतदान केंद्रात व्हीव्हीपॅट मशिन्सच्या आधारे मतमोजणी करावी लागणार आहे. मात्र यामुळे निवडणुकीच्या निकालासाठी काही काळ उशीर होण्याची शक्यता अनेक स्तरावरून व्यक्त करण्यात येत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.