नवी दिल्ली – वितरकांनी फेब्रुवारी महिन्यात ग्राहकांना विकलेल्या प्रवाशी वाहन विक्रीत 10 टक्क्याची वाढ झाली आहे. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन या वितरकांच्या संघटनेने सांगितले की, फेब्रुवारी महिन्यात 2,54,058 प्रवाशी वाहनांची विक्री झाली. गेल्या वर्षी या महिन्यामध्ये वाहनांची विक्री फार कमी झाली होती.
फेब्रुवारी महिन्यात दुचाकींची विक्री 16 टक्क्यांनी कमी झाली आहे. व्यावसायिक वाहनांची विक्री 29 टक्क्यांनी कमी झाली आहे. तीन चाकी वाहनांची विक्री 49 टक्क्यांनी कमी झाली आहे. मात्र ट्रॅक्टरची विक्री देशात चांगला पाऊस पडल्यामुळे 18 टक्क्यांनी वाढली आहे.