प्रवासी वाहन विक्री आणखी मंदावली

एप्रिल महिन्यात प्रवासी वाहन विक्रीत झाली 17 टक्‍के घट

नवी दिल्ली – वाहन क्षेत्राला मंदीने चांगलेच ग्रासले असल्याची चिन्हे दिसून येत आहेत. एप्रिल महिन्यात प्रवासी वाहन विक्री तब्बल 17 टक्‍क्‍यांनी कमी झाली असल्याचे उत्पादकांची संघटना असलेल्या सिआमने म्हटले आहे. एप्रिल महिन्यात प्रवासी वाहन विक्री 17 टक्‍क्‍यांनी कमी होऊन ती केवळ 2,47,541 युनिट एवढी झाली आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात 2,98,504 इतकी वाहने विकली गेली होती.

एप्रिल महिन्यात कार विक्रीत 20 टक्‍क्‍यांची घट होऊन या महिन्यात केवळ 1,60,279 कार विकल्या गेल्या. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात 2,00,183 इतक्‍या कार विकल्या गेल्या होत्या. त्यामुळे वाहन उद्योग क्षेत्रात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. एप्रिल महिन्यात मोटरसायकलची विक्री 12 टक्‍क्‍यांनी कमी होऊन 10,84,811 इतकी झाली आहे. गेल्या वर्षी मात्र एप्रिल महिन्यात 12,30,046 इतक्‍या मोटरसायकल विकल्या गेल्या होत्या. एप्रिल महिन्यात एकूण दुचाकी विक्रीत साडेसोळा टक्‍क्‍यांची घट झाली. त्या महिन्यात केवळ 16,38, 388 इतक्‍या दुचाकी विकल्या गेल्या. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात 19,58, 761 दुचाकी विकल्या गेल्या होत्या.

व्यावसायिक वाहन विक्रीतही एप्रिल महिन्यात सहा टक्‍क्‍यांची घट झाली आहे एप्रिल महिन्यात 68 हजार 680 एवढी व्यावसायिक वाहने विकली गेली. एप्रिल महिन्यात एकूण वाहन विक्रीत 15.93 टक्‍क्‍यांची घट झाली आहे. या महिन्यात 20,01,096 एवढी वाहने विकली गेली. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात 23,80,294 एवढी वाहने विकली गेली होती.

वाहनांची विक्री कमी होत असल्यामुळे काही कार कंपन्यांनी आपल्या उत्पादनात कपात केलेली आहे. त्याचबरोबर वाहनांची विक्री होत नसल्यामुळे वितरकांच्या कामावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. वितरकांकडे वाहनांची संख्याही वाढत आहे. एक तर व्याजदर आणखीही तुलनेने जास्त आहेत. त्याचबरोबर वाहनावर जास्त जीएसटी आहे. या कारणामुळे ग्राहक वाहन खरेदी करण्यास धजावत नाहीत.

त्याचबरोबर पुढील वर्षाच्या एप्रिल महिन्यापासून उत्सर्जनाचे नवे मानदंड लागू होणार आहेत. त्यामुळे ग्राहक खरेदी करीत नाहीत. कंपन्या नव्या तंत्रज्ञानावर करण्याची तयारी करीत आहे. त्यामुळे हे वर्ष वाहन उद्योग क्षेत्रासाठी नकारात्मक जाण्याची शक्‍यता वाढली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.