प्रवासी वाहन विक्री वाढेल : तरुण गर्ग

नवी दिल्ली- लॉकडाऊनच्या काळात सुरक्षित प्रवासासाठी कारचे महत्त्व लोकांना कळाले आहे. त्यामुळे आगामी काळात कार विक्री वाढेल याबाबत आशावादी आहोत, असं ह्युंदाई कंपनीचे संचालक तरुण गर्ग यांनी सांगितले.

ते म्हणाले की, सुरक्षित प्रवासासाठी आता विविध वर्गातील लोक त्यांना परवडेल अशी कार विकत घेण्याचा प्रयत्न करतील असे बऱ्याच अभ्यास अहवालात म्हटले आहे. मागणी वाढणार असतानाच कारसाठी लागणाऱ्या सेमीकंडक्‍टरचा तुटवडा जाणवत आहे.

याबाबत ते म्हणाले की ही जागतिक पातळीवरील समस्या असून यातून मार्ग काढण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न सुरू केले आहेत. अल्काझार हे नवीन मॉडेल सादर करताना ते म्हणाले की भारतामध्ये एसयूव्ही वाहन प्रकाराला ग्राहकाकडून जास्त पसंती मिळत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.