तारक मेहता का उल्टा चष्मा फेम अभिनेत्री मुनमुन दत्ता ऊर्फ बबिताच्या अडचणी वाढल्या आहेत. अनुसूचित जातींबाबत केलेल्या एका टिप्पणीनंतर तिच्याविरुद्ध इंदूरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपर्ण प्रकाराबद्दल पोलीस अधिक माहिती घेत आहेत.
अभिनेत्री मुनमुन दत्ता सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असते. त्यातच तिने काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यात तिने एका विशिष्ट जातीबद्दल आपत्तीजनक टिप्पणी केली होती. त्यावरून तिच्यावर टीकेची झोड उठली आहे.
या प्रकरणी गुन्हा नोंद होण्यापूर्वीच अभिनेत्री मुनमुन दत्ताने माफी मागितली होती. मी माझ्या व्हिडिओत चुकीच्या शब्दांचा वापर केल्यामुळे अनवधानाने कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्या प्रत्येक व्यक्तीची क्षमा मागते. तसेच भाषेच्या अडचणीमुळे चुकीचा शब्द माझ्याकडून वापरला गेला होता आणि त्या शब्दाचा चुकीचा अर्थ मला सांगितला गेला होता, असे तिने आपल्या माफीनाम्यात म्हटले आहे.