शिरूर : शिरूर शहरात विविध भागात कोरोना पॉझिटिव 10 रुग्ण आढळले असल्याची माहिती शिरूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तुषार पाटील यांनी दिली आहे. तर कोरोनामुळे शहरातील डंबेनाला भागातील एका बेकरी व्यावसायिकाचा मृत्यू झाला आहे.
शिरूर शहरात कोरोनाची साखळी तुटता तुटेना. यामुळे नागरिक भयभीत प्रशासन पुन्हा चिंतेत पडले आहे. शिरूरच्या नवनवीन भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने या रुग्णांची हिस्ट्री आता प्रशासनाला मिळत नसल्याने शिरूर मध्ये कोरोनाचा पादुर्भाव कुठून कसा होतोय हेच प्रशासनाला समजू शकत नाही.
शिरूर शहरातील भाजी बाजार येथील ५५ वर्षीय व्यवसायिक, सुभाष चौक येथील वृद्धाच्या संपर्कात आलेल्या तिघेजण नातेवाईक, सिद्धार्थ नगर येथील एका वृद्धाला, सोनार आळी येथील एक ४९ वर्षीय महिला, डंबे नाला येथील 62 वर्षीय पुरुष, हुडको वसाहत येथील 29 वर्षीय कंपनी कामगार, मुंबई बाजार येथील 28 वर्षीय पुरुष, सय्यद बाबा नगर येथील 32 वर्षीय कंपनी कामगार.
शिरूर शहरातील विविध भागात असे एकूण10 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, शिरूर शहरातील कोरोना बाधितांची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने शिरूर नगर परिषदेने नियोजन करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर पुणे येथे कोरोनाबाधितांसाठी चे बेड संपलेले असून आता नागरिकांना किंवा कोरोना बाधितांना उपचारासाठी शिरूर शहरात बेडची आवश्यकता भासत असून यासाठी प्रशासन यांनी लवकरात लवकर प्रयत्न करावे. शिरूर शहरात रोजची कोरोना बाधितांची संख्या चिंताजनक असून हि कोरोना ची साखळी तोडण्यासाठी योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.