“क्‍लोनिंग’च्या प्रकारांमध्ये वाढ

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरामध्ये एटीएम क्‍लोनिंगचे प्रकार होत असल्याचे दिसून येत आहे. एकाच बॅंक शाखेतील पाच जणांची फसवणूक झाल्याने क्‍लोनिंगचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

क्‍लोनिंग म्हणजे डेबिट किंवा क्रेडिट कार्डचे बनावट कार्ड तयार करुन त्याद्वारे फसवणूक केली जाते. डेबिट कार्डमध्ये असणाऱ्या मॅग्नेटिक स्ट्रीपमध्ये ग्राहकाच्या खात्याची सर्व माहिती असते. ठग “स्कीमर’ नावाच्या एका उपकरणाचा वापर कार्ड क्‍लोनिंग करण्यासाठी करतात. हे उपकरण कार्ड स्वॅपिंग मशीन किंवा एटीएममध्ये फिट केले जाते.

कार्ड स्वाईप केल्यावर कार्डमधील सर्व माहिती कॉपी होते. ही माहिती एका ब्लॅंक कार्डमध्ये कॉपी केली जाते आणि बनावट कार्ड अर्थात ग्राहकाच्या कार्डचे क्‍लोन कार्ड तयार होते. एटीएम किंवा स्वाईप मशीनच्या कीपॅडमध्ये ग्राहक आपला पिन नंबर टाकतो तेव्हा छुप्या कॅमेऱ्याच्या किंवा आणखी एका उपकरणाच्या माध्यमातून पिन प्राप्त करुन घेतला जातो.

यानंतर ठग क्‍लोन कार्डच्या मदतीने कॅश काढून किंवा ऑनलाईन ट्रान्झॅक्‍शन करुन पैसे लुटतात. कार्डची माहिती कॉपी करुन शकणारे उपकरण ई-कॉमर्स साईट्‌सवर देखील अवघ्या काही हजारांमध्ये मिळत असल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. या उपकरणासोबत काही ब्लॅंक कार्ड देखील मोफत दिले जात आहेत. स्कीमरमधील कॉपी डेटा प्लेन कार्डमध्ये टाकून सेव्ह केले जाते आणि ते प्लेन कार्ड क्‍लोन कार्ड बनते.

या गोष्टींची घ्या काळजी

-कार्ड वापरताना स्वाईप मशीन किंवा एटीएममध्ये स्कीमर तर नाही ना? याची खात्री करुन घ्यावी.

-स्कीमरचं डिझाईन एखाद्या मशीनच्या पार्टसारखे असते. यामुळे स्वॅपिंग पॉईंटच्या आजूबाजूला हात लावून बघा की, काही लावलेलं तर नाहीये.

-की-पॅडचा एक कोपरा दाबून बघा, की-पॅडवर स्कीमर असल्यास एका भाग वर उचलला जाईल.

-वेळोवेळी एटीएमचा पिन बदलावा

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)