हडपसर – हडपसर गावठाण -सातववाडी प्रभाग क्रमांक २३ मधील काळेपडळ येथे उभारण्यात आलेल्या कै. डॉ .समीर खंडोजी बोराटे अग्निशमनकेद्रांचे लोकार्पण माजी नगरसेवक मारुतीआबा तुपे यांच्या हस्ते करण्यात आले. माजी नगरसेवक मारुतीआबा तुपे यांच्या प्रयत्नातून व विकासनिधीतून सर्व सुविधायुक्त असे हे अग्निशमन केंद्र उभारण्यात आले आहे.त्याचे लोकार्पण करण्यात आले आहे.
यावेळी माजी नगरसेवक मारुतीआबा तुपे , जीवन जाधव,महापालिका अग्निशमन दलाचे प्रमोद सोनवणे,अनिल गायकवाड,दत्तात्रय चौधरी, शिवा शेवाळे, गोरख तुपे , संकेत झेंडे, कुणाल चौरे ,सतीश भिसे ,ओंकार तुपे ,विकास तावरे, ओंकार शेवकर, अमोल मोरे,बाळासाहेब शेडगे, आबासाहेब पिलाणे,सुनिल पांढरे,नितीन पाटिल,हनुमंत शिदें,गणेश गुंड, राहुल धेडे,अस्मल शेख, अंबिका डोमगावकर,उज्वला पवार,ऊषा वेळुकर, पुनम पाटील व अग्निशामक दलाचे सर्व अधिकारी , सेवकवर्ग तसेच मंत्रा मॅजेस्टीक सोसायटीतील सभासद उपस्थित होते.
वचनपूर्तीचे समाधान
काळेपडळ हा परिसर विकसित होत आहे. अनेक नवीन वसाहती उभ्या राहत आहेत, शाळा- कॉलेज, मंगल कार्यालये, हॉटेल्स, अपार्टमेंटची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे याभागात अग्निशमन केंद्राची गरज होती. यासाठी याभागात एक अग्निशमन केंद्र उभारण्यात येईल.असे नागरिकांना जाहिरनाम्यात वचन ही दिले होते.आता हे केंद्र सुरू झाल्यामुळे आगीच्या घटना तातडीने रोखता येतील.
मारुती तुपे माजी नगरसेवक, भाजपा हडपसर