हडपसर – भाजपा शहर उपाध्यक्ष जीवन जाधव यांच्याकडून जनसामान्यांचे प्रश्न सुटून परिसराच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
भाजप शहर उपाध्यक्ष जीवन बापू जाधव यांच्या जाधव मळा येथील जनसंपर्क कार्यलयाचे उदघाटन पाटील यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते.यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य शिवाजीराव भुजबळ, नगरसेवक मारुती तुपे, शिरीष कुलकर्णी,भुषण तुपे ,रवि तुपे,हवेली धनंजय कामठे,भाजप नेते योगेश ढोरे,सचिन हांडे,महादेव उंद्रे, आबासाहेब शिगोटे,नारायण डांगे,म्हस्कु कोंढाळकर,स्मिता गायकवाड,महेश ससाणे,विकास भुजबळ,संदीप राऊत,दत्ता घुले,पै दत्ता घुले, विशाल येवले,राजेंद्र तरवडे,सोपान लोंढे,आदी मान्यवर उपस्थित होते. 30 वर्षांच्या सेवाभावी कार्याला येणाऱ्या मनपा निवडणुकीत सुज्ञ जनता न्याय देईल, असा विश्वास यावेळी जीवनबापू जाधव यांनी व्यक्त केला.
दरम्यान 2 हजार कुटुंबाना आयुष्यमान भारत डिजिटल कार्ड वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. संदिप जगताप,उमेश भुजबळ, हेमंत वाडकर, बापु मिरेकर, शिवराम आप्पा घुले,बाळुमामा भानगिरे,संतोष जाधव,संजय भुजबळ ,कीरण लोंढे ,सुजित वाडकर, सुबोध ससाणे,बाळासाहेब घुले,हर्षल जाधव ,जीवन जाधव मित्रपरिवाराने कार्यक्रमाचे संयोजन केले.