सातारा -जिल्ह्यात काल (दि. 5) रात्री 12 वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या अहवालांनुसार, पुन्हा सहा करोनाबाधितांचा मृत्यू झाला, तर आणखी 220 नागरिक करोनाबाधित झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार यांनी दिली. दरम्यान, जिल्ह्यातील रुग्णालये, डीसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेतलेल्या 44 जणांना बुधवारी घरी सोडण्यात आले.
जिल्ह्यातील करोनाबाधितांची तालुकानिहाय संख्या आणि त्यापुढे कंसात आजअखेरच्या बाधितांची एकूण संख्या – सातारा 84 (51467), फलटण 48 (37097), खटाव 25 (25645), कोरेगाव 16 (21842), माण 11 (17771), कराड 9 (38998), खंडाळा 8 (14124), वाई 5 (15698), जावळी 2 (9983), महाबळेश्वर 1 (4677), पाटण 1 (10101) व इतर 10 (2127), असे आजपर्यंत एकूण दोन लाख 49 हजार 530 करोनाबाधित आहेत.
त्याचबरोबर गेल्या 24 तासांमध्ये खटाव तालुक्यातील दोन आणि खंडाळा, कोरेगाव, सातारा व वाई या तालुक्यांमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण सहा हजार 109 करोनाबळी झाले आहेत.