केंद्र सरकारच्या आर्थिक उपाययोजना अपुऱ्या – कॉंग्रेस

मोदी सरकारने देश आर्थिक डबघाईला आणला
नवी दिल्ली: अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी म्हणून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना काल ज्या उपाययोजना जाहीर केल्या आहेत त्या तोकड्या आणि अपुऱ्या आहेत अशी टीका कॉंग्रेस पक्षाने केली आहे.

बॅंकांची वाढती बुडित कर्जे आणि घसरणारा विकास दर रोखण्यासाठी यात कोणती ठोस उपाययोजना आहे असा सवालहीं कॉंग्रेसने केला आहे. पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी मोदी सरकारने देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आणल्याचाही आरोप केला आहे. केवळ दिखाऊ घोषणा करून त्या मागे सरकारला लपता येणार नाही असेही त्यांनी म्हटले आहे.
देश आज आर्थिक मंदीत होरपळतो आहे.

देशापुढे मोठ्या समस्या निर्माण झाल्या आहेत. पण त्यावर उपाययोजना म्हणून सरकारने काय केले तर त्यांच्याच अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या अनेक घोषणा त्यांनी मागे घेतल्या आहेत. अर्थमंत्र्यांनी 32 स्लाईडचे पॉवर पॉईन्ट प्रेझेंटेशन काल सादर केले पण तेवढे करून त्यांना या मागे लपता येणार नाही. सरकारच्या या साऱ्याच योजना साफ तोकड्या आहेत असेही सुर्जेवाला यांनी नमूद केले आहे.

 

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×