नागरिकांची शोध मोहीम सुरू; प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष, एकही अधिकारी फिरकेना
वडूज (प्रतिनिधी) – खटाव तालुक्यातील कुरोली शिरसवस्ती येथील येरळा नदीतील पाण्याच्या प्रवाहात युवक वाहून गेला आहे. गणेश लालासो पाटोळे (वय-२९) असे त्या युवकाचे नाव आहे. नदीपात्रात अनेक नागरिक गणेशचा शोध घेत आहेत. व प्रशासनाशी संपर्क साधत आहेत. मात्र अद्याप एकही अधिकारी घटनास्थळी आला नाही. यामुळे नागरिक संतप्त झाले असून रास्ता रोको करण्याच्या पवित्र्यात आहेत.
दरम्यान, गणेश शेत मजुरी करण्यासाठी या ठिकाणी आला होता. दरम्यान सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे येरळा नदीपात्राच्या पाण्यात वाढ झाली आहे. आणि या पाण्याचा अंदाज न आल्याने तो वाहून गेला आहे.