-->

आयसिसचा म्होरक्या बगदादीच्या खात्म्याचा व्हिडीओ अमेरिकेकडून जारी 

वॉशिंग्टन : अवघे जग इस्लाममय करण्याची स्वप्नं पाहणाऱ्या आणि निष्पाप नागरिकांच्या कत्तली करत सुटलेला ‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया’ अर्थात आयसिस या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबू बक्र अल-बगदादी याच्याविरोधात अमेरिकेने चालवलेल्या मोहिमेत बगदादीचा खात्मा झाला आहे. याचा एक व्हिडीओ अमेरिकेच्या विशेष पथकाने ट्विटरद्वारे शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये बगदादीचा कशाप्रकारे खात्मा करण्यात आले, याचे चित्रीकरण आहे.

दरम्यान, बगदादी हा एका भूयारात लपला होता. अमेरिकन सैन्याने केल्या आत्मघातकी हल्ल्यात तो मारला गेला आहे. तसेच बगदादीसोबत लपलेले त्याचे तीन मुलेही मारले गेले असल्याच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले होते. ते म्हणाले की,  कुठलाही बगदादी आता कुठल्याच निष्पाप माणसाला, स्त्रीला किंवा मुलांना इजा पोहचविणार नाही. कारण हा बगदादी कुत्र्यासारखा मरण पावला असून, त्यामुळे आता जग हे एक सुरक्षित ठिकाण झालं आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.